शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

शरद पवारांचा दुष्काळप्रश्नी शब्दच्छल : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 20:08 IST

सरकारने दुष्काळसदृश स्थिती जाहीर केली म्हणून विरोधकांनी राजकारण करण्याचे कारण नाही. किमान आम्ही ‘दुष्काळ’ हा शब्द तरी वापरला, मागील सरकारने दुष्काळ टाळण्यासाठी ‘टंचाई’ हा शब्द शोधून काढला होता.

ठळक मुद्देमागील सरकारने दुष्काळाऐवजी टंचाई शोधून काढली!आम्ही लाभार्थींच्या यादीची तपासणी करणार आहोतजनावरांसाठी चारा आणि दुष्काळग्रस्तांसाठी पाण्याची व्यवस्था करताना सरकार कोठेही कमी पडणार नाही

सांगली : सरकारने दुष्काळसदृश स्थिती जाहीर केली म्हणून विरोधकांनी राजकारण करण्याचे कारण नाही. किमान आम्ही ‘दुष्काळ’ हा शब्द तरी वापरला, मागील सरकारने दुष्काळ टाळण्यासाठी ‘टंचाई’ हा शब्द शोधून काढला होता. त्यामुळे शरद पवारांनी अशाप्रकारचा शब्दच्छल करण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगलीत लगावला.

येथे  जिल्हयातील सर्व शासकीय विभागांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधाला.ते म्हणाले की, केंद्र शासनाने दुष्काळासंदर्भात पाहणी करण्यासाठी शाष्ट्रीय पद्धत तयार केली आहे. त्यामध्ये ट्रिगर पद्धतीने पाहणी करण्यात येते. महाराष्टतही आता दोन ट्रिगर पूर्ण केल्यानंतर १८० तालुके दुष्काळसदृश जाहीर केले आहेत. केवळ घोषणा नव्हे, तर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली आहे. अशा तालुक्यांमध्ये वीजबिल, शिक्षण शुल्क सवलत, जमीन महसूल वसुली थांबविणे अशा सर्वप्रकारच्या सवलतीही लागू केल्या आहेत.

पाणी व चारा उपलब्ध करून देण्याचे नियोजनही केले जात आहे. दुष्काळ जाहीर करण्याचा टप्पा पुढचा आहे. तरीही इतक्यात ‘दुष्काळसदृश’ या शब्दावरून राजकारण सुरू झाले आहे. आम्ही किमान ‘दुष्काळ’ या शब्दाचा वापर तरी केला. मागील सरकारने दुष्काळ हा शब्दच वगळून ‘टंचाई’ व ‘टंचाईसदृश’ अशाप्रकारचा शब्द वापरला होता. त्यामुळे कॉँग्रेस व राष्टवादीच्या नेत्यांनी लोकांची दिशाभूल करणे बंद करावे. राजकारणासाठी राजकारण करून त्यांना काहीही मिळणार नाही.

राज्यातील भूजल पातळीत घट झाली म्हणूनही विरोधकांनी जलयुक्त शिवार योजनेची खिल्ली उडविली. वास्तविक पहाटे उठून गेली वर्षभर आपल्या गावासाठी राबणाऱ्या, श्रमदान करणाºया तमाम लोकांचा अपमान ते करीत आहेत. त्यांनी केलेल्या कष्टाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. राज्य शासनाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. काही सामाजिक संस्थांनीही याकामी हातभार लावून संपूर्ण देशात सर्वात मोठे काम महाराष्टÑात केले. जलयुक्त शिवार योजनेमुळे भूजल पातळी वाढलेलीच होती. गेल्या तीन वर्षाची आकडेवारी पाहिली तर, ते सिद्धही करता येते. यंदा दुष्काळसदृश परिस्थिती, पाण्याची मागणी व त्यातून झालेला भूजलाचा उपसा यामुळे ही पातळी घटल्याचे दिसत आहे. याचा अर्थ जलयुक्त शिवार योजना कुचकामी ठरली, असा होत नाही. त्यामुळे कॉँग्रेस, राष्टवादीच्या नेत्यांनी परिस्थितीचा अभ्यास करूनच बोलावे, असे ते म्हणाले.गोंधळ होणार नाही!दुष्काळाचे मोजमाप करताना गोंधळ होणार नाही. सांगली जिल्चेच उदाहरण घेतल्यास आटपाडीसारख्या भागात सरासरीच्या ३५ टक्के पाऊस, तर दुसरीकडे शिराळा तालुक्यात १३० टक्के पाऊस अशी स्थिती आहे. अशावेळी सरासरीत गफलत होऊ शकते, मात्र सरकारने शास्त्रीयदृष्ट्या पाहणी करताना कोणत्याही भागावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. जनावरांसाठी चारा आणि दुष्काळग्रस्तांसाठी पाण्याची व्यवस्था करताना सरकार कोठेही कमी पडणार नाही, असे फडणवीस म्हणाले. 

लाभार्थींची तपासणी करणारमुद्रा योजनेतील गैरप्रकारांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मुद्रा योजनेचा लाभ कोणाला झाला, त्याची यादी आम्ही मागविली आहे. एकाच व्यक्तीला वाढीव कर्ज देताना मुद्रा योजनेचा वापर केला असेल तर, अशा यादीतून त्या गोष्टी कळू शकतात. त्यामुळे आम्ही लाभार्थींच्या यादीची तपासणी करणार आहोत. तरीही असे प्रकार कोठे घडल्याची तक्रार नाही. 

म्हैसाळ भ्रूणहत्या प्रकरणाबाबत चौकशी करू!फडणवीस म्हणाले की, राज्यातील गुन्च्या प्रकरणात शिक्षेचे प्रमाण वाढले आहे. त्याबाबत सक्त सूचना पोलीस दलाला दिल्या होत्या. काही जुन्या प्रकरणांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे लवकर आरोपपत्र दाखल न होणे, तपासात अडथळे येणे व त्यामुळे न्यायालयीन प्रकरणांना उशीर होणे, असे प्रकार घडले आहेत. अशा जुन्या प्रकरणांचा तपास करून न्यायालयीन बाबींचा जलदगतीने निपटारा करण्याचे आदेश दिले आहे. म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाबद्दल चौकशी करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSangliसांगलीSharad Pawarशरद पवार